कल्याण
केडीएमसीच्या महत्त्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासह काही उपक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचे युवानेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य उद्धव ठाकरे उद्या (१७ फेब्रुवारी) रोजी कल्याणमध्ये येणार आहेत.
स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याणच्या खाडीकिनारी (दुर्गाडी किल्ल्याजवळ) उभारण्यात येणाऱ्या नौदल संग्रहालय आणि अडीच किलोमीटरच्या खाडीकिनारा सुशोभीकरणाच्या कामाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन केले जाणार आहे. त्याचसोबत नव्या दुर्गाडी पुलाच्या पूर्ण झालेल्या उर्वरित दोन मार्गिकांचेही – लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
त्याचबरोबर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून पूर्वेतील तिसगाव येथे केडीएमसीने उभारलेल्या डायलिसिस केंद्राचे लोकार्पण तसेच महापालिका मुख्यालयात नव्याने सुशोभीकरण झालेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे उद्घाटनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी