Power by The Web Cloud Media

कल्याणच्या सारंगला मिळाला युवा कला गौरव पुरस्कार

पुण्यातील आर्ट बिटस् फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार

कल्याण

कल्याणमधील युवा चित्रकार सारंग केळकर याला “युवा कला गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रकला या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार पुण्यातील ‘आर्ट बिटस् फाउंडेशन’तर्फे देण्यात आला आहे.

सारंग केळकर यांची एक नवोदित चित्रकार म्हणून या क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की, आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *