April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

कारची कंटेनरला धडक

ठाणे

भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने चाललेल्या कारने मागून कंटेनरला धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्ग घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून अपघातग्रस्त गाड्या रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता मोकळा करून दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

कार मालक- चालक ओमप्रकाश अग्रहरी हे मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबई मार्गिकेवरून जात असताना त्यांची कार रात्री ११.२२ मिनिटांनी कोरम मॉलसमोर, नितीन कंपनी जंक्शनजवळ आल्यावर त्या कारने पुढे असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन, वाहतुक पोलीस आणि अग्निशमन दल या विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून तो मार्ग वाहनांसाठी मोकळा करून दिला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.