ठाणे
कोपरी जवळील जीवन संगीत इमारतीच्या पाहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १२ मधील गॅलरीमध्ये ठेवण्यात आलेल्या जुन्या कपड्यांना व पुस्तकांना शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
ही आग राजेश दुगावकर यांच्या मालकीच्या घराच्या गॅलरीत लागली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत, त्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी