April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

वानरलिंगी सुळका सर करत शिवरायांना मानवंदना

कल्याण

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्वराज, सुराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंतीनिमित्त कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी गिर्यारोहण नेहमीच आयोजित करणाऱ्या संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना एक अनोख्या आणि साहसी प्रकारे मानवंदना देण्यात आली.

जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्यासमोर असलेला वानरलिंगी सुळका ज्याची उंची ही पायथ्यापासून सुमारे ४८० फूट उंच आहे असा हा सुळखा केवळ काही तासांच्या आत सर करून महाराजांना अनोखी आदरांजली वाहिली. जमिनीपासून ते सूळक्याच्या पायथ्याची उंची ही सुमारे ३००० फूट उंच आहे. त्यामुळेच याचे नाव वानरलिंगी सुळखा आहे.

जंगलातून वाट काढत, वन्य प्राण्यांच्या वावरात नाणेघाटाच्या टोकावरून सूळक्याच्या पायथ्याशी पोहचायला सुरुवात सकाळी ०८ वाजता झाली. साधारण तासाभरात पायथ्याशी पोहचल्यानंतर सर्व प्रथम मानवंदना म्हणून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघातर्फे महाराजांची आरती करण्यात आली. आरती झाल्यावर संघाने सुळका सर करायला रोप बांधायला घेतली. रोप बांधत असतांना जरा जरी चूक झाली तर थेट खाली सुमारे ३००० फूट दरीत कोसळून मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यामुळे चुकीला माफी नव्हतीच. पण अनुभवी संघाने कोणतीही चुकी न करता आपल्या तंत्रशुद्ध पध्दतीने गिर्यारोहण पूर्ण करून सूळख्याचा कळस गाठून एक वेगळ्याप्रकारे शिवरायांना मानवंदना दिली. ४८० फुटांचा हा सुळका सर करायला सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाला तीन तासांचा वेळ लागला.

मोहिमेत पवन घुगे, रणजित भोसले, दर्शन देशमुख, भूषण पवार, अक्षय जमदरे, कल्पेश बनोटे, प्रशिल अंबाडे, प्रतीक अंबाडे, नितेश पाटील, महेंद्र भांडे, सचिन पाटील हे सहभागी झाले होते.