April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण

महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व संत निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेवसिंहजी यांच्या हस्ते झाले लोकार्पण

 नवी मुंबई

संत निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृती शिल्पाचे नुकतेच नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि संत निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेवसिंहजी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी खासदार राजन विचारे, संत निरंकारी मंडळाचे महाराष्ट्र व दक्षिणी राज्यांचे प्रभारी मोहन छाब्रा आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक, स्थानिक नागरीक आणि संत निरंकारी मंडळाचे अनेक प्रबंधक व शेकडो अनुयायी या लोकार्पण सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पुढाकार घेऊन निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पटनी मैदानावर सन २००५ ते २०१३ अशी ९ वर्षे झालेल्या महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमातून प्रसारित झालेल्या दिव्य मार्गदर्शनाच्या स्मृती कायम टिकून राहाव्यात या हेतुने संत निरंकारी मिशनचे भक्तगण व सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकभावनेचा आदर करुन पटनी मैदानालगत पटनी रोड जिथे ठाणे-बेलापूर रोडला येऊन मिळतो तिथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे प्रेरणादायक स्मृती शिल्प उभारण्यात आले आहे.