व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने २५ सीसीटीव्ही कॅमेरे
कल्याण
कल्याण शहर ज्वेलर्स असोशिएशनच्या वतीने शहरातील महत्वाच्या ठिकाणी २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या हस्ते आज करण्यात आला.
येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित सभारंभात हा कार्यक्रम संपन्न झाला.
व्यापारी वर्गाने दिलेल्या सहकार्यातून बाजारपेठ परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. ‘एक कॅमेरा देशासाठी, समाजासाठी’ आवश्यक असल्याची बाब वरिष्ठ पोलिस निरिक्षक होनमाने यांनी यावेळी अधोरेखित केली. हे कॅमेरे सुरु झाल्याने बाजारपेठ परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांवर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. तसेच, काही गुन्हा घडल्यास आरोपी पकडण्यासाठीही मदत होणार आहे. कॅमेऱ्यामुळे २४ तास सुरक्षेची हमी मिळणार आहे.
महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच पोलीस बीटमध्ये व्यापारी आणि नागरीकांच्या सहभागातून ३९४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यास मदत होत असल्याचेही होनमाने यांनी सांगितले.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू