April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

अभिनेत्री मीरा जोशी

अभिनेत्री मीरा जोशी

महिला दिन विशेष : असा आहे मीरा जोशीचा अभिनयाचा प्रवास

डान्स रियालिटी शो दरम्यान झालेल्या अपघातामुळे कोरिओग्राफीकडे वळले. त्यानंतर, बऱ्याच रियालिटी शोमध्ये असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केले. तेथील काम बघून मला अवार्ड शोसाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून बोलावले. या कामामुळेच पुढे मला बाजीराव मस्तानी आणि शिमला मिरची या चित्रपटासाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करायला बोलवले.

महिला दिनानिमित अभिनेत्री मीरा जोशी यांच्यासोबत केलेली बातचीत…

अभिनेत्री मीरा जोशी
अभिनेत्री मीरा जोशी

अभिनेत्री हा शिक्का बसण्याआधी हि तू कोरिओग्राफर म्हणून आजही ओळखली जातेस, तर तुझ्या आयुष्यातील नृत्याची सुरुवात कशी झाली…?

माझे बाबा बँकेत कार्यरत असल्याने त्यांची तीन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गोवा, रत्नागिरी आणि सातारा याठिकाणी झाले. आणि उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात जर्मन भाषेत झाले. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्मनचा डिप्लोमा पूर्ण केला. लहानपणापासूनच डान्सची आवड असल्याने रत्नागिरीमध्ये कथ्थक तर सातारा आणि पुण्यामध्ये भरतनाट्यम शिकले. एवा मारिया चेरुकुरू यांच्याकडे डान्स आवड म्हणून लॅटीन अमेरिकन शिकले. महाविद्यालयात असताना डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचे. तर, दुसरीकडे जर्मन लँग्वेजमध्ये स्पेशलायझेशन सुरु होते. जर्मन लँग्वेजमध्ये युनिवर्सिटीमध्ये तिसरी आली. यावेळी, अभ्यासात चांगली असल्याने आईबाबांनी जर्मन भाषेत करियर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पण, मला डान्सच करायचा असल्याने मी याच क्षेत्राकडे यायचा निश्चय केला.

मुंबईत आल्यानंतर २०१० पासून डान्स रियालटी शो करायला सुरुवात केली. डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोच्या दरम्यान झालेल्या अपघातात पाठीला दुखापत झाली. त्यामुळे, डॉक्टरांनी डान्स कमी किंवा बंद करण्याचा सल्ला दिला. ज्याच्यासाठी मुंबईत आले तेच करायला मिळत नसल्याने द्विधा मनस्थितीत होते. डान्स रियालिटी शो दरम्यान झालेल्या अपघातामुळे कोरिओग्राफीकडे वळले. त्यानंतर, बऱ्याच रियालिटी शोमध्ये असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केले. तेथील काम बघून मला अवार्ड शोसाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून बोलावले. या कामामुळेच पुढे मला बाजीराव मस्तानी आणि शिमला मिरची या चित्रपटासाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करायला बोलवले.

कोरिओग्राफी ते अभिनय क्षेत्र प्रवासाबद्दल…

अॅक्टिंग क्षेत्राकडे वळायचे असे काही आधी ठरवले नव्हते. पण, बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या वेळी तेथील वातावरण पाहून भारावून गेल्याने मी अॅक्टिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण, त्यावेळी अॅक्टिंगबद्दल काहीही माहिती नव्हते. या क्षेत्राबद्दल सुद्धा जास्त माहिती नव्हती. या क्षेत्रात ओळखीचे, तसेच नात्यातील असे कोणीच नव्हते. त्यामुळे या क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसल्याने स्वतःच धडपड करत शिकायला सुरुवात केली. डान्सिंग ते कोरिओग्राफर, कोरिओग्राफर ते अक्टिंग असा प्रवास घडत गेला. ऑडीशन देऊन सुद्धा सुरुवातीला दीड वर्ष काहीच काम मिळाले नाही. पण, आता हा प्रवास एकदम छान प्रकारे सुरु झाला आहे. माध्यम कोणतेही असो अॅक्टिंग हे अॅक्टिंग असते. आणि त्यामुळे मालिका, चित्रपट किंवा ओटीटीमध्ये काम करायला तेवढीच मज्जा येते. कोणी गॉडफादर किंवा ओळखीचे कोणी नसल्याने मी सतत ऑडिशन देत असते. ऑडिशन देऊन जी कामे मिळतात ती कामे करत असते. बऱ्याचदा ओळखीतूनच कामे मिळतात. आणि माझी तशी काही ओळख नसल्याने किंवा कोणी गॉडफादर नसल्याने बरीचशी कामे ऑडिशनमुळेच मिळवावी लागतात. त्यात रंगरूप, कॅरेक्टर हे सुद्धा जुळून आले पाहिजे. त्यामुळे ज्या माध्यमात काम करायची संधी मिळेल त्यात काम करत असते.

अभिनेत्री मीरा जोशी
अभिनेत्री मीरा जोशी

एमएक्स प्लेयर’वर आलेल्या ‘इंदौरी इश्क’ वेब सीरिजबद्द्दल…

लॉकडाऊन दरम्यान कास्टिंग दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांचा फोन आला. त्यांनी या सिरिजबद्दल सांगत कॅरेक्टर पाठवले. त्यात दोन कॅरेक्टर होते. एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीचे आणि दुसरे वीस-बावीस वर्षांच्या एका तरुणीचे. मला आतापर्यंत मराठी मालिकेत निगेटिव्ह आणि बोल्ड भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. मराठीतल्या एका चॅनेलने मला सांगितले कि, मराठी हिरोईन सोजवळ. सोशिक, दया येणारी असली पाहिजे. तुज्याकडे बघून ते अजिबात वाटत नाही. त्यामुळे तुला पॉझिटिव्ह भूमिका मिळणार नाहीत. आतापर्यंत बोल्ड आणि निगेटिव्ह भूमिकेसाठी विचारण्यात आल्याने मला प्रोस्टीट्युटसाठी विचारले असेल असे वाटले. पण १९-२० वर्षांच्या मुलीचे ऑडीशन द्यायला मापुस्कर यांनी सांगितल्यावर सुरुवातीला थोडा धक्का बसला. पण या भूमिकेमुळे खूप खुश झाले. मग घरच्या घरीच ऑडीशन रेकॉर्ड करून पाठवले. ज्यात माझी निवड झाली. त्यात एक दोन बोल्ड सीन होते. मग मी लुक टेस्ट दिली. लुक टेस्ट दिल्यानंतरही माझी निवड झाली. पण ‘इंदोरी इश्क’ या सिरीजमध्ये साकारलेली आलियाची भूमिका माझ्या आजवरच्या कामापेक्षा वेगळी आहे. आलिया साकारताना आव्हान आले होते. नेहमीच्या धाटणीला सोडून वेगळ काम करायची संधी मला या वेबसिरीजमुळे मिळाली.

अभिनेत्री मीरा जोशी
अभिनेत्री मीरा जोशी

प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काहीना काही शिकायला मिळत असते. ज्यावेळी लॉकडाउन लागले त्यावेळी सगळेच चिंतेत होते. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार कमी झाले. धंदे ठप्प झाले. सर्वच क्षेत्रावर कोरोनाचे सावट पसरले होते. लॉकडाउनच्या अगोदर आमच्या घराच्याखाली एक पाणीपुरीवाले काका रोज पाणीपुरीचा ठेला लावायचे. कोरोना काळात सगळ्यांचे बाहेर फिरणे बंद झाले. त्या काळात पाणीपुरीवाले काका दोन दिवस मला दिसले नाहीत. तिसऱ्या दिवशी ते काका फळाची गाडी घेऊन येताना दिसले. त्यांनी स्वतःला परिस्थितीनुसार बदलून घेत पुढे गेले. आपण बरेच वेळा रडत बसतो. पण, त्यातून तोडगा काढून पुढे जाता आले पाहिजे. अशा वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी उदाहरणे घेता येतील.
मला अभिनेत्रीमध्ये शेफाली शहा प्रचंड आवडते. आणि अभिनेत्यांमध्ये बरीच नावे आहेत त्यातल्या त्यात नसरुद्दिन शहा, इरफान खान, नवाझुद्दिन सिद्दिकी अशी बरीच मोठी लिस्ट आहे.

अभिनेत्री मीरा जोशी

महिला दिनाचे तुझ्या आयुष्यातील नेमके काय महत्व आहे….
महिला दिन एकाच दिवशी साजरा न करत दरदिवशी साजरा झाला पाहिजे. एकाच दिवशी महिलेला सन्मान न देता तो वर्षभर दिला पाहिजे. महिलांना पूर्ण वर्षभर त्यांचे हक्क त्यांना मिळायला हवेत.
प्रत्येक बाई, प्रत्येक स्त्री हि स्ट्रॉग आहे. कोणाच्याही दडपणाखाली न जाता ती स्वतः कर्तुत्व गाजवू शकते. तिला स्वतःवर विश्वास ठेवला तर ती जगच काय..? तर, चंद्रतारे सुद्धा जिंकू शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे, आत्मविश्वास दाखवणे गरजेचे आहे.

आगामी प्रोजेक्ट विषयी बोलायचे झाले तर, महाराष्ट्र टुरिझमसाठी एक ट्रव्हलिंग शो केला आहे. ज्यात सूत्रसंचालन केले आहे. घुडचडी नावाच्या एका हिंदी फिल्ममध्ये काम केले आहे. ज्यात संजय दत्त, रविना टंडन, अरुणा इराणी आहेत. असुराकुल नावाची एक हॉरर फिल्म करत आहे. त्याचबरोबर दोन तीन गाणी केली आहेत. जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच वृत्ती नावाचा चित्रपट साउथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्म म्हणून निवडला गेला आहे.

 

हेदेखील वाचा — 

महिला दिन विशेष : लैंगिक समानता आवश्यक

महिला दिन विशेष : महिलांना ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचा ध्यास घेतलेल्या रंजना शेडगे