कल्याण
पूर्वेतील आडीवली गाव येथे जागतिक महिला दिन मंगळवारी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कुणालदादा दिनकरशेठ पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमधील विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
गणेश चौक येथील मैदानात आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक माजी नगरसेवक कुणाल पाटील, समाजसेविका श्वेता कुणाल पाटील, समाजसेवक अनिल पाटील, प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरच्या अध्यक्षा नितादिदी, कल्याण पूर्व बिल्डर्स असोशिएशनचे अध्यक्ष विजय भाने, आडीवलीचे सरपंच बळीराम भाने, उद्योजक राम जाधव, नकुल भोईर, प्रल्हाद भोईर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रख्यात गायिका सोनाली भोईर यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते महेश तपासे यांचा कुणाल पाटील यांनी सन्मान केला. तपासे यांनी उपस्थित महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी, उपस्थित महिलांशी कुणाल पाटील यांनी संवाद साधला. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब जनतेचे जे हाल झाले त्याची आठवण करीत आपल्या प्रभागातील व परिसरातील महिला भगिनींनी आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी मोठे योगदान दिले. समाजातील दुर्बल घटकांना अन्नधान्य, आरोग्यविषयक सुविधा तसेच आर्थिक मदत करण्यासाठी जे-जे करणे शक्य होते ते कुणालदादा दिनकरशेठ पाटील फाउंडेशन, राकेशदादा युवा मित्र मंडळ, विजयदादा कदम फाउंडेशन, महिला बचत गटाच्या इत्यादीच्या माध्यमातून माताभगिनींच्या सहकार्याने, आशीर्वादाने मी करू शकलो, असे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमात सहभागी महिलांच्या नावाचा चिठ्ठीच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यात प्रथम आलेल्या कुसुम जयस्वाल या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या मानकरी ठरल्या. द्वितीय- कुसुम नाना कोरे यांना फ्रीज तर तृतीय- प्रणिता प्रसून यांना वाशिंग मशीन वितरीत करण्यात आले. उपस्थित सर्वच महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. महिलांचा भव्य हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला.
महिला बचत गटाच्या अध्यक्षा नानी, श्वेता कुणाल पाटील यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रमाचे नियोजन केले होते. श्रृती व प्रतिभा यांनी खूप सुंदर व्यवस्थापन केले. सुमारे चार तास रंगलेल्या याकार्यक्रमासाठी मैदानही अपुरे पडले. भरगच्च सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांची कार्यक्रमात रेलचेल होती. लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लासुरे यांनी केले.
हे देखील वाचा..
महिला दिन विशेष : महिलांना ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचा ध्यास घेतलेल्या रंजना शेडगे
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू