कल्याण
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कर्तुत्ववान व गुणवंत अशा ७५ महिला शिक्षकांचा सत्कार येथील के. सी. गांधी ऑडोटोरियम येथे केला.
शाळा-महाविद्यालयामध्ये प्रामाणिक नोकरी सांभाळून कला, क्रीडा क्षेत्रात व सामाजिक, राजकीय क्षेत्रात ज्या महिला शिक्षकांनी आपले योगदान समाजासाठी दिलेले आहे. अशा महिला शिक्षकांना नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांशी संवाद साधत आमदार गाणार म्हणाले कि, विद्यार्थी आता आपल्या घरापासून दुरावत चालले आहेत. आई-वडिलांबरोबर किंवा परिवाराबरोबर एकमेकांमधील संवाद कमी होत चालला. म्हणून, विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांनी आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणे गरजेचे आहे.
कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ना. सी. फडके, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, कोकण विभाग कार्यवाह शशिकांत चौधरी, कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष आर. डी. पाटील, कार्यवाह गुलाबराव पाटील, ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष एकनाथ दळवी, कार्यवाह भुवनेश कुंभार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप भोईर, प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी तर आभार एकनाथ दळवी यांनी मानले.
हे देखील वाचा…
कल्याण : बारच्या काचेवर सावित्रीबाई फुलेंचा फोटो; शिवसेना महिला आघाडी आक्रमक
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू