अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
ठाणे
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील टॉप २० मधील सराईत सोनसाखळी चोरटा मेहंदी हसन मुस्लिम जाफरी (२४) या चोरट्याला ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याविरोधात ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी सोनसाखळीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला शीळडायघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
टॉप २० मधील सराईत सोनसाखळी चोरटा मेहंदी जाफरी हा मुंब्रा येथील राहते घरी आला असल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे यांना मिळाली होती. त्याला ताब्यात घेत असताना त्याने आरडाओरड केला. त्याला पोलीस पथकाचे ताब्यातून सोडवण्यासाठी इराणी महिला व परिसरातील लोकांकडून पथकातील अंमलदार यांच्याशी झटापटी केली. तरीसुद्धा पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्यात नेत, त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने शीळ डायघर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी शिळडायघर पोलिसांच्या ताब्यात दिले.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी