कल्याण पूर्व येथे विजयाचा जल्लोष साजरा
कल्याण
भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोवा येथे उमेदवार उभे केले. मात्र, त्यांना नोटापेक्षाही कमी मतदान झाले. यामुळे मतदारांनी शिवसेनेला लायकी दाखवून दिली अशी टीका भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे. आमदार गायकवाड यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्व येथे विजयाचा जल्लोष साजरा केला. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
हा उत्सव विजयाचा, असून भाजपावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड येथे पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्याबद्दल पूर्वेतील तिसाई हाऊस या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आणि लाडू वाटून तसेच ढोल-ताशांच्या निनादात मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मनोज राय, भाजप पदाधिकारी संदीप तांबे, भाजयुमो युवती विभाग कोकण सहसंपर्क प्रमुख अदिती खामकर, नितेश म्हात्रे आदींसह इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू