April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण : ‘आतंरराष्ट्रीय नद्या कारवाई’ या विषयावर मार्गदर्शन

पर्यावरण दक्षता मंडळाचा उपक्रम

कल्याण

आतंरराष्ट्रीय नद्या कारवाई या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने १४ मार्च रोजी करण्यात आले आहे.

पर्यावरण दक्षता मंडळ हि एक स्वयंसेवी संस्था असून पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रात गेली २२ वर्षे कार्यरत आहे. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणारी एक मजबूत आणि स्वयंपूर्ण संघटना तयार करणे हा दृष्टीकोन समोर ठेवून संस्थेची स्थापना झाली. शाश्वत विकासासाठी युवकांना जागतिक आव्हानांचा स्वीकार करण्यास सक्षम करणे, हे पर्यावरण दक्षता मंडळाचे मिशन आहे. हे मिशन पार पाडण्यासाठी पर्यावरण शाळा, निसर्ग भटकंती, पालवी, जलसाक्षरता, वसुंधरा – पर्यावरण माहिती केंद्र, ‘आपलं पर्यावरण’ मासिक अशा अनेक प्रकल्पांची सुरवात केली.

वर्षभर येणारे पर्यावरण दिन हे सुद्धा त्या विषयाची जनजागृती करण्यासाठी एक माध्यम म्हणून बघितले जाते. १४ मार्च,  आंतरराष्ट्रीय नद्या कारवाई दिन हा देखील असाच एक दिन. मुक्त वाहणाऱ्या नद्या रक्तवाहिन्यांप्रमाणे असून जगातील परिसंस्थांना गोड पाण्याचा स्रोत मिळवून देत जैवविविधतेचे पोषण करतात असे असूनही जगभरातील नद्या खंडित, अवगुंठित व प्रदूषित होत आहेत. सन १९९७ ला ब्राझीलमध्ये मानव आणि जीवावरण (मॅन अँड बायोस्फियर प्रोग्रॅम), आतंरराष्ट्रीय नद्या जाल, नर्मदा बचाओ आंदोलन या संस्थांच्या प्रतिनिधींनी आतंरराष्ट्रीय नद्या कारवाई गट बनविला आणि त्या गटाच्या सदस्यांनी १४ मार्च हा आतंरराष्ट्रीय नद्या कारवाई दिन म्हणून पळाला जावा असे ठरविले.

आपल्या आजूबाजूला अनेक परिसंस्था आहेत त्यातील नदी हि एक परिसंस्था. नदी परीसंस्थेचे आपल्या पर्यावरणातील महत्त्व, सांप्रतकाळात नद्यांच्या संवर्धनाची आवश्यकता व कृती आणि आतंरराष्ट्रीय नद्या कारवाई या विषयावर पर्यावरण दक्षता मंडळांने दिनांक १४ मार्च रोजी सायं. ७ ते ८ या वेळेत गुगल मीट या ऑनलाईन माध्यमाद्वारे नदी अभ्यासक अविनाश कुबल हे मार्गदर्शन करणार आहेत. पर्यावरण दिनानिमित्त अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ९५९४१७४६५३, ८८७९७३२१०९, ९८२०९५०७१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.