उल्हासनगर : मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शूटिंग निवड चाचणी स्पर्धा ही तोलानी महाविद्यालय अंधेरी येथे पार पडली. यात एसएसटी महाविद्यालयच्या कुणाल पांचाळ याने 531 पॉइंट्स घेत पिस्टल या क्रीड़ा प्रकारात मुंबई विद्यापीठ टीम मध्ये निवड करण्यात आली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा ही मानव रचना इंटरनॅशनल विद्यापीठ फरीदाबाद येथे होणार आहे.

कोविडमुळे मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा या वर्षात रद्द करण्यात आल्या आणि निवड चाचणीद्वारे आंतर विद्यापीठ स्पर्धासाठी खेळाडुंची निवड करण्यात आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या अत्यंत अतितटीच्या निवड चाचणीत कुणालने आपले नाव मुंबई विद्यापीठाच्या टीम मध्ये कोरले.
मुंबई विद्यापीठाचे क्रीड़ा संचालक डॉ. मोहन आमृले यांनी त्याचे अभिनंदन केले तसेच एस. एस. टी. महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार, मार्गदर्शक अंकित सिंह यां सर्वांनी सुद्धा विजेत्या कुणलचे अभिनंदन केले आणि फरीदाबाद येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास