महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही
कल्याण
संत सावळाराम महाराज म्हात्रे यांनी मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या ढोके गावात महाविद्यालयाची स्थापना केली आहे. सन १९८७ साली बांधलेली वास्तू आज जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी महाविद्यालयाची सिमेंटचे पत्रे जीर्ण झाले आहेत. तर कुठे भिंतींना तडे गेले आहेत. याची मनसे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली असून महाविद्यालयाच्या विकासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी आमदार पाटील यांनी दिले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावं म्हणून संत सावळाराम महाराज म्हात्रे यांनी हे महाविद्यालय सुरु केलं. मात्र, महाविद्यालयाची झालेली दुरवस्था पाहून मनसे आमदार देखील आश्चर्य चकित झाले होते. महाविद्यालयाची सर्व माहिती घेऊन संबंधित शाळेच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा करून महाविद्यालयाची वास्तू नव्याने बांधण्यासाठी हातभार लावणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार मोरेश्वर भोईर, पंचमहाभूत संघटनेचे आगरी साहित्यिक सर्वेश तरे, मर्चंट नेव्ही ऑफिसर गणेश पाटील, ॲड. सुंशांत पाटील, सर्वोदय महाविद्यालयाचे संचालक महेंद्र पाटील, हभप विनीत म्हात्रे, जीवन मढवी उपस्थित होते.
संत सावळाराम महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडावी यासाठी विविध उपक्रम केले. कुणीच शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गावोगावी जाऊन शिक्षणाचा प्रचार केला तसेच महाविद्यालयाची स्थापना केली. या विद्यामंदिराचे स्मारक व्हावे अशी मागणी होत आहे
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू