कल्याण
रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या निर्देशानुसार आरटीओ कार्यालयात शेकडो रिक्षाचालंकासह पदाधिकारी यांनी धडक दिली. रिक्षा पासिंग योग्यता प्रमाणपत्र शुल्क, आँनलाईन तारीख घेतल्यावरही आरटीओ तपासणीत हजारो रुपये दंड आकारणे, मेमो देणे बंद करा या मागणीसाठी यावेळी धडक देण्यात आली.
दडांत्मक भुर्दंड टाळण्यासाठी ऑनलाईन पासिंग तारीख घेतलेल्या पासिंग विना प्रलंबित रिक्षा तातडीने अतिरिक्त वाहन तपासणी निरीक्षक यांची नेमणूक करुन प्रलंबित रिक्षा पासिंग काम निकाली काढा. रिक्षा पासिंग काम या करिता पहाटे चार ते पाच व दिवसभर उपासमारी करत मनस्ताप सहन करत ताटकळत वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी व जलदरित्या रिक्षा पासिंग करणे कामी सुव्यवस्था व टोकन पध्दत सुरु करा, प्रलंबित रिक्षा पासिंग जलद रित्या होणे कामी आँनलाईन स्लॉट कोटा वाढ करा.
रिक्षा पासिंग ट्रॅकवर रिप्लेक्टर पट्टी, जादा पैसे घेणे, सॅनिटायझरच्या नावे आर्थिक लुट बंद करा, रिक्षा पासिंग ट्रॅक वर शौचालय, पिण्याचे पाणी, ऊन वारा यापासून संरक्षण, बसण्याची व्यवस्था शेड मुलभुत सोयीसुविधा उपलब्ध करून द्या. रिक्षा पासिंग संदर्भात रिक्षाचालंकाच्या विविध अडचणी समस्यांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन दखल घेत समस्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे मान्य केले.
याप्रसंगी सुबल डे, जाँन कॅलिमिनो, जितु पवार, संतोष नवले, वैभव हरदास, काका मढवी, शगीर शेख, नूर जमादार, बंडु वाडेकर, विजय डफळ, संजय बागवे, संदिप म्हेञे, हेमंत ठाणगे, वंसत पाटील, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, भास्कर बडगुजर, चंद्रकांत शिंदे, राजा भालेराव, सुभाष मिरकुटे, शरद पाटील, राधे चौव्हान, अविनाश पाटील आदी पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते.
हेदेखील वाचा…
कल्याण : संत सावळाराम महाराज विद्यालयाची मनसे आमदारांनी केली पाहणी
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू