April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

अभ्यासाचे सोपे तंत्र याबाबत मार्गदर्शन करताना संदीप परब

अभ्यासाचे सोपे तंत्र याबाबत मार्गदर्शन करताना संदीप परब

उल्हासनगर : तणावमुक्त परीक्षेबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

उल्हासनगर

दहावीची परीक्षा अगदी जवळ आली आहे. अशा वेळी परीक्षेला सामोरे जाताना ताण-तणाव कसा दूर ठेवावा आणि अभ्यासाचे कसे नियोजन करावे याबाबत सम्राट अशोक नगर, येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. शिक्षण, जनआरोग्य आणि महिला-बाल विकास व पर्यावरण या विषयांवर काम करणाऱ्या लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजर्षि छत्रपती शाहू विद्या प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

मागील दोन वर्ष कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा पार पडल्या होत्या. त्यानंतर आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यंदा दहावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आणि लेखनाचा कस लागणार आहे. म्हणून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षा देण्याविषयी लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत फेब्रुवारी महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयात समुपदेशन वर्ग घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्र आयोजित आले होते.

शिक्षण क्षेत्रात मागील २० वर्ष काम करणारे संदीप परब यांनी यावेळी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे आणि अभ्यासाचे सोपे तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. परब यांनी मागील सात ते आठ वर्ष शिक्षण पद्धती आणि शिकवण्याचे नवनवीन तंत्र याबाबत सखोल अभ्यास केला आहे. शिक्षण मुलांवर लादू न देता त्यांच्यातील उपजत क्षमतेला प्रोत्साहन देणारी पद्धत सद्या आवश्यक आहे, असे मत परब यांनी यावेळी व्यक्त केले.

विद्यार्थी मित्रांनी परीक्षेवर लक्ष केंद्रीत करतानाच भविष्याचाही विचार करायला हवा जेणेकरून उद्दिष्ट डोळ्यासमोर राहिल्यास एकाग्रता आणि सकारात्मक विचार वाढवण्यास फायदा होतो, असा सल्ला संदीप परब यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी, त्यांनी एकाग्रता, बुद्धिमत्ता, व्यापक विचार करण्याचा दृष्टिकोन अशा मुद्यांना चपखल उदाहरणांसह सादर केले. जागतिक कीर्तीचे ख्यातनाम शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे आयुष्य आणि त्यांनी असाध्य दुर्मिळ आजारावर मात करून केलेलं प्रचंड संशोधन याचा दाखला परब यांनी दिला.

लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रवीण काजरोळकर, शिक्षण सल्लागार शैलेश कसबे, राजर्षि छत्रपती शाहू विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेव सोनावणे, महा. अंनिसचे राज्य पदाधिकारी उत्तम जोगदंड आदी यावेळी उपस्थित होते.

हेदेखील वाचा…

कल्याण : संत सावळाराम महाराज विद्यालयाची मनसे आमदारांनी केली पाहणी

कल्याण : स्वभाव हा स्त्रीचा दागिना आहे तो जपलाच पाहिजे – कथाकथनकार गडकरी 

कल्याण : आरटीओ कार्यालयात रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची धडक