मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी
कल्याण
‘द कश्मीर फाइल्स’ काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे वास्तव दाखवणारा चित्रपट असून हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
१९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे वास्तव दाखवणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित काश्मिरी हिंदूंना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. तसेच, काश्मिरी हिंदूंच्या मुलांना महाराष्ट्रात शैक्षणिक आरक्षणही जाहीर केले होते. ‘द कश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव या निमित्ताने प्रथमच जगासमोर आणले जात आहे. हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी आणि काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे निश्चितच या चित्रपटाला करमुक्त करतील, अशी आमची अपेक्षा असल्याचे समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले. आज या संदर्भातील एक निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा…
मुंबई : इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे
कल्याण : संत सावळाराम महाराज विद्यालयाची मनसे आमदारांनी केली पाहणी
उल्हासनगर : तणावमुक्त परीक्षेबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कल्याण : स्वभाव हा स्त्रीचा दागिना आहे तो जपलाच पाहिजे – कथाकथनकार गडकरी
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू