April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या सात

सलग सहा दिवस मृत्यू आकडा शून्यच

ठाणे

मार्च महिन्यातील दुसरा सोमवार हा ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला आहे. जिल्ह्यात सोमवारी अवघ्या सात रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक चार रुग्ण हे नवीमुंबई महापालिका हद्दीत सापडले आहेत. तर, सलग सहा दिवसात एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका दोन नगरपालिका येतात आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोमवारी चक्क कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक अंकी झाली आहे. आज नोंदविण्यात आलेल्या ७ रुग्ण संख्येने आत्तापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या सात लाख आठ हजार ६२१ झाली आहे. तर सहा लाख ९६ हजार ५०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एकूण ११ हजार ८७८ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची २२९ इतकी आहे.

आज ठामपा, उल्हासनगर आणि  कुळगाव-बदलापूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तर नवीमुंबईत ४ रुग्णांचा समावेश आहे.तर कल्याण-डोंबिवली,भिवंडी मीरा-भाईंदर, अंबरनाथ आणि ठाणे ग्रामीण येथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही.