कल्याण
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भर रस्त्यात एकाच्या गळ्यावर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना पश्चिमेत घडली आहे. हल्ला करून हल्लेखोर पसार झाला असून महात्मा फुले चौक पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
माथाडी कामगार असलेले शंकर मनोहर कांबळे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जेवण करून ओक बाग जवळील रस्त्यालगत आराम करीत बसले होते. यावेळी, त्यांच्या परिचयाचा असलेला शिवाजी उर्फ शिवा वाकचौरे याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाचा तगादा लावला. कांबळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या शिवाने प्रथम शिवीगाळ केली. त्यानंतर धारदार चाकूने हल्ला करीत त्यांच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात शिवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू