कल्याण
महिलांनी स्वतःसाठीही जगायला पाहिजे असे मत कल्याणच्या नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी येथे व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण महिला शाखेच्या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
त्यापुढे म्हणाल्या, महिलांनी नवरा, मुलं, कुटुंब, नोकरी जरूर करावी आणि ते आपलं कर्तव्यच आहे. पण हे सर्व करतांना काही वेळ स्वतःसाठीही ठेवावा. ज्यामध्ये तुमचा व्यायाम, गाण ऐकणे, वाचन, फिरणे आपल्याला आवडत ते करावं. बाहेर कार्यक्रमाला आलं की घर, ऑफिस याचा विचार करायचा नाही. स्वतःसाठी जगायचं, नवीन शिकायचे आहे ते शिका, मला वेळ नाही मिळत हे नेहमीच कारण नका सांगू, वेळ काढला तर नक्की वेळ मिळतो, तुम्ही घरात राहूनही स्ट्रगल करून पुढे जाऊ शकता, यश संपादन करु शकता व आपल्या कार्यक्षेत्रात आपले नाव उमटवू शकता असे सांगुन बचत गटांना सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले.
महिला शाखा अध्यक्ष लता पालवे यांनी महिलांना एकत्र येण्यासाठी आवाहन करताना सांगितले की, व्हाट्सअपच्या स्टेटसवरील रेसिपीला छान छान म्हणण्यापेक्षा मैत्रिणीला घरी बोलउन खाऊ घाला. एकमेकींशी संवाद ठेवा. संवाद खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे एकमेकांचे सुख-दुःख शेअर करता येतात. महिला दिनाचे औचित्य साधून नेहमीपेक्षा वेगळं क्षेत्र निवडून यश संपादन केलेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
तसेच, विविध स्पर्धा व मनोरंजन करणारा “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम सूत्रसंचालक सचिन दराडे यांनी घेतला. यात पैठणीच्या प्रथम शितल पालवे, द्वितीय क्रमांक मनीषा सांगळे, तृतीय क्रमांक अनिता गीते यांना मिळाला. तर उपविजेत्या मनीषा घुगे, चंद्रकला दराडे, मिनल दराडे ठरल्या. याप्रसंगी महिलांनी आठवणीत राहील अशी संध्याकाळ आम्ही अनुभवली अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्षा वंदना सानप यांनी केले. तर वार्षिक अहवाल सचिव यशोदा आव्हाड यांनी वाचून दाखविला. याप्रसंगी जयश्री दौंड, मनिषा घुगे, अश्विनी डोमाडे, सविता घुगे व इतर महिलांनी विशेष परिश्रम घेतले.
हेदेखील वाचा…
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू