कल्याण
जनरल एज्यूकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत सार्वजनिक वाचनालय, कल्याणचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांची `उपाध्यक्ष’ पदावर बिनविरोध निवड झाली. सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा नुकतीच हाती घेतल्यानंतर आता या पदासाठीही ते सज्ज झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील रोटरी क्लबचे डिस्ट्रीक गव्हर्नर म्हणूनही ते काम पाहतात. कल्याणमधील अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही ते मोलाची कामगिरी पार पाडीत आहेत. जनरल एज्यूकेशन इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था असून अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अग्रणीची भूमिका बजावित आहे. कुलकर्णी यांच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याची माहिती सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी दिली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू