April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण : शिवसेना पदाधिकाऱ्यांना चित्ररथातून श्रध्दांजली अर्पण

शिवजयंती मिरवणुकीत शिवसेना रामबाग शाखेचा भावना व्यक्त करणारा चित्ररथ

कल्याण

कोरोना महामारीत जनतेची सेवा करताना कल्याण शिवसेनेचे जे शिलेदार मृत्युमुखी पडले त्यांना अभिवादन व श्रध्दांजली अर्पण करणारा चित्ररथ शिवजयंती मिरवणुकीत शिवसेना रामबाग शाखेने साकारला आहे. यामध्ये माजी महापौर राजेंद्र देवळेकर, माजी नगरसेवक दशरथ घाडीगावकर, चंद्रकांत पावशे, परिवहन सदस्य मधुकर यशवंतराव, शिवसेना पदाधिकारी दिपक सोनाळकर आदींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. हि संकल्पना कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांची आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्या नंतर शिवाजी महाराज छत्रपती झाले ही सोप्पी वाटणारी गोष्ट नव्हती. चार ही बाजूने संकटे चालून येत असताना देखील शिवाजी महाराजांनी स्वराज्य रयतेचे राज्य उभे करण्यासाठी अपार कष्ट घेतले. स्वराज्यावर अनेक अस्मानी संकटा बरोबरच सुलतानी संकटे आले. स्वराज्याच्या या लढाईत अनेक शिलेदार कामी आले. मोठ्या जिद्दीने मेहनतीने आणि संयमाने न डगमगता आलेल्या संकटावर मात करत शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य उभारले व छत्रपती झाले.

सर्व नागरिकांनी कोरोना संकटाचा सामना केला आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांनी डोळ्यासमोर ठेऊन रयतेची सेवा केली. कीती ही मोठे संकट आले तरी धीराने नेटाने संयमाने सामना केला. जोपर्यंत आशावाद जिवंत आहे तोपर्यंत लढण्याची जिद्द कमी होता कामा नये. सगळीच युध्द सीमेवर लढली जात नाहीत, काही संयम ठेऊन लढावे लागतात. कोरोना वायरस विरोधातील युद्धात आपण सर्वांनी संयमाने मुकाबला केलेला आहे. शिवसेना कल्याण शहर शाखेचे अनेक धडाडीचे योध्दे कोरोना महामारीच्या या युध्दात रयतेची सेवा करताना मृत्युमुखी पडले. त्या सर्वांना शिवसेना कल्याणच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली असल्याचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले.