परिसरात पसरले धुराचे लोट
कल्याण
पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आज सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे धुराचे मोठे लोट नागरी वस्तीत पसरल्याने धुराचा त्रास नागरिकांना होताना दिसत असून आगीबाबतची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या चार गाडय़ांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु केला.
पश्चिम परिसरात असलेल्या खाडी किनारी सायंकाळच्या सुमारास सुटलेला वारा आणि कचऱ्यापासून तयार झालेला मिथेन वायू यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
केडीएमसी क्षेत्रात दररोज ६०० ते ६६० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर हा कचरा टाकण्यात येतो. मात्र डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने हा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने केडीएमसीला दिले आहेत. त्यानुसार केडीएमसीने उंबर्डे येथे ३५०मेट्रीक टन व बारावे येथे २०० मेट्रीक टनाचा घनकचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार केला आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा उग्र वास आणि सातत्याने लागलेल्या आगीमुळे होणार्या धुराने परिसरातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत.
२०१६ मध्येही सहावेळा आग लागल्याचा प्रकार घडला होता. यावेळी लागलेल्या भीषण आगीत कचरा डेपोशेजारी असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. गेल्या वर्षी दोन ते तीन वेळा भीषण आग लागली होती. मागील अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंडला आग लागली जात असताना त्याचा शोध मात्र प्रशासन अजूनही लावू शकलेली नाही.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू