April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

लेखक आपल्या भेटीला

डोंबिवली

२३ एप्रिल, जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून डोंबिवली ग्रंथसंग्रहालय आणि धृव नॉलेज वेल्फेअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक, अभिनेते दीपक करंजीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

दीपक करंजीकर यांनी बोलताना सांगितले की, “आजच्या विश्वाचे आर्त हा घात सूत्राचा एक प्रकारे पूर्व भाग आहे. त्यात त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची माहिती दिली आहे. त्यानंतर उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न आणि त्या संशोधनातून तयार झालं घातसूत्र! पुढील काळात घातसूत्रातील प्रश्नांची उत्तरे या विचारमंथनावर हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करतील जगामध्ये कोणत्याही आर्थिक घटना या विनाकारण पडत नाहीत. त्या मागे एक सूत्र असतं आणि तेच सामान्य माणसाचा घात करतो आपण अशा जागतिक घटनांचा विचार करून त्यातील सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न करेल केला पाहिजे, असं मनोगत यावेळी दीपक करंजीकर यांनी व्यक्त केलं.

व्याख्यानानंतर या कार्यक्रमामध्ये उपस्थितांनी यांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांच्या शंकांचे निरसन दीपक करंजीकर यांनी केले. या कार्यक्रमाला डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विष्णू सोमण, सचिव सुभाष मुंदडा तसेच इतर पदाधिकारी ध्रुव व नॉलेज वेल्फेअर सेंटरचे प्रमुख विनोद देशपांडे सुप्रसिद्ध लेखक, प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे, मृदुला दाढे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी केले आणि आभार रिध्दी केरकर यांनी मानले.