अंबरनाथ
ओवीयन प्रोडक्शन अंबरनाथ या नाट्यसंस्थेतर्फे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरवासीयांसाठी एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर दिनांक १ मे २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय शिवसेना शाखा अंबरनाथ पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहे.
या हेल्थ कॅम्पचे उद्घाटन लेखक, वृत्तनिवेदक आनंद लेले तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्लास्मा ब्लड बँक, डोंबिवली तर्फे डॉ. स्वप्नाली गायकर आणि डॉ. स्वप्नील अत्तरदे उपस्थित राहणार आहेत.
तरी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे आणि सर्व रुटीन चेकअप करून घ्यावीत. जेणेकरून त्यांना आपले प्रकृती स्वास्थ्य जाणून घेण्यास मदत होईल असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू