मुंबई
आपली जर विचारधारा सुस्पष्ट असेल तर आपल्याला परिस्थिती आरशा प्रमाणे दिसते. ज्यात चूक बरोबर दोन्ही गोष्टी दिसतात, भविष्यात होऊ पाहणारे बदल देखील दिसतात. ही विचारधारा सुनिश्चित असेल तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. मी असं म्हणेन, आपण नेहमी सत्तेचं राजकारण करतो. माझ्या मते, राजकारण हा आरसा आहे. सत्ता ही नंतरची गोष्ट आहे. समाजात बदल आला तो तर तो राजकारणाच्या आरशात दिसेल. राजकारणात बदल नसल्यान आरश्यात वेगळं काही दिसणार नाही. प्रतिबिंब बनविण्यासाठी मूळ चित्र बनवावे लागते. इतिहासातून आपण फक्त शिकू शकतो पुन्हा तसं नाही करू शकत. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची वेगळी आहे.
असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (१० मे) यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान सभागृहात व्यक्त केले. त्याच्या समकालीन राजकारण आणि आंबेडकरवादी आकलन या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी २०१७ पासून लिहिलेल्या अग्रलेखांच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि चौफेर विषयांवर केलेले लेखन या पुस्तकात संपादित केले आहे.
‘समकालीन राजकारण आणि आंबेडकरवादी आकलन‘ या पुस्तकाचे प्रकाशन प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्यावतीने करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल, हिंदी सिनेदिग्दर्शक नीरज घायवान, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, आमदार कपिल पाटील, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, जितरत्न पटाईत, वैभव खेडेकर यासंह, वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, डिमांड आणि सप्लायची थियरी माहित असेल त्यामुळे परिणाम दिसत राहतात. आजच्या या मटेरियलिस्टिक जगात स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारणं आणि सक्षम होणं ही प्रत्येकाची गरज झाली आहे. आरक्षण च्या मुद्द्यावर सगळेच चिंतीत आहे. आज पुन्हा त्या वर्गाला परिणामांचा आरसा दाखवण्याची गरज आहे. सध्याची बिघडलेली परिस्थिती दंगलीचे राजकारण करण्याचे प्रयत्न, देशभरात दंगली होणार अशी चर्चा होती. मागील दोन वर्षाच्या कोविडने सगळ्यांची आर्थिक परिस्थिती इतकी कमकुवत केली. त्यामुळे नागरिकांनी देखील त्यात हात पाय न अडकवता या राजकारणापासून स्वतःला लांब ठेवले. हा एक प्रकारचा बदल आहे. खाजगीकरणाचा मुद्दा निघाला तेव्हा आरक्षणवर होणाऱ्या परिणामाबद्दल देखील विचार झाला. आरक्षण बाबत बोलायचे झाले तर वुई (we) बद्दल बोलावं लागेल. पब्लिक सेक्टर मोठा असल्याचे जागतिकीकरणाचा धाव आपल्यावर आर्थिक दृष्टिकोनातून झाला नाही. आपली इकॉनॉमी सक्षम आहे ज्याचे कारण म्हणजे खाजगी सेक्टर पेक्षा दहापटीने मोठा असलेला पब्लिक सेक्टर आहे. यासाठी सरकारने म्हणायला हवं होतं पब्लिक सेक्टर वाचले पाहिजे आणि ते वाचले तर आरक्षण वाचेल. ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या देखील आपण सुरक्षित राहू शकतो. पण दुर्भाग्याने आपण वुई (we) तर सोडाच आय (I) झालो आहोत ही सगळ्यात मोठी कमजोरी आहे आणि धार्मिक शक्ती वाढतेय.
आपण जो पर्यंत स्वकेंद्रित आयुष्य सोडून जगत नाही नाही तो पर्यंत बदल दिसून येणार नाही. इंडियन नेस ही ओळख जाऊन आता हिंदुत्वाचा धार्मिक रंग चढला आहे. मात्र जिंकणार तोच जो विचारधारेला धरून चालले आणि त्याचा प्रचार-प्रसार करेल. आता विचारांचा आणि विचारांच्या प्रतिनिधींचे दिसणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी म्हटलंय, रिव्होल्यूशन आणि काउंटर रिव्होल्यूशन ज्या दिवशी रिव्होल्यूशन थांबेल त्यादिवशी काउंटर रिव्होल्यूशन जिंकेल. आपली दर्शनी स्वरूपातील विचारधारा मतांच्या रूपात दिसली नाही तर तुम्ही लोकशाहीत जगणे कठीण आहे. तोच टक्का व्यवस्थेला कंट्रोल करतो.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी