April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

Kalyan : हेल्पिंग हँण्ड संस्थेला अमरऊर्जा पुरस्कार

कल्याण

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कल्याण मधील हेल्पिंग हँण्ड या संस्थेला अमर हिंद संस्थेच्या वतीने अमरऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात कल्याण मधील हेल्पिंग हँण्ड सामाजिक संस्थेने दादर येथील अमर हिंद संस्था आयोजित अमरऊर्जा पुरस्करासाठी अर्ज केला होता. पूर्ण महाराष्ट्रातून १९ संस्थांनी अर्ज केला होता. त्यानुसार संस्थेच्या कार्यकरणीने प्रत्येक्ष भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. संस्थेचे कागदपत्र,ऑडिट सर्व पहाणी केली. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तीन संस्थांची निवड केली. त्यामध्ये कल्याणने मान मिळवला असून हेल्पिंग हँण्ड सामाजिक संस्थेची अमर ऊर्जा पुरस्कार साठी निवड झाली. रविवारी रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे हा पुरस्कार संस्थेला देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सचिन राउत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हा पुरस्कार दिल्याबद्दल अमर हिंद मंडळाचे आणि हा पुरस्कार ज्यांच्या मुळे मिळाला ते दानशुर नागरिक, मित्रपरिवार आणि कुटूंब या सर्वांचे आभार राउत यांनी मानले आहेत.