टिटवाळा
मातोश्री विद्यामंदिर नेरूळ येथे नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतमध्ये टिटवाळा येथील जीवनदीप महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकाची घवघवीत यश प्राप्त केले आहे. यात महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी घरत ४५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक, वैभव भोईर ८१ किलो वजनी गटात सुवर्ण पदक, उदय सिंग ५५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक, सनिद्या मोरे ८९ किलो निवड चाचणी प्रथम, सिध्दांत कदम ९६ किलो निवड चाचणी तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ. कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, क्रीडा शिक्षक प्रा. मोहनिश देशमुख यांनी कौतुक केले.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू