Manpada पोलिसांची कामगिरी
डोंबिवली : दुचाकीवरून चैन स्नॅचिंग करणाऱ्या विकेश रमाशंकर तिवारी आणि मनोजकुमार भारतसिंग ठाकुर या दोघांना Manpada पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली.
चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी विविध पोलीस पथके तयार केली होती. या पथकांनी ज्या भागातुन चैन स्नैचिंग झाली आहे. त्या भागातील ५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी मानपाडा पोलीसांनी केली. चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मानपाडा पोलीसांकडून अहोरात्र सर्वोतोपरी प्रयत्न चालु होते. मानपाडा पोलीस डोबिंवली शहरामधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा पाठलाग करत असताना चैन स्नैचिंग करणारे विकेश तिवारी आणि मनोजकुमार ठाकुर (दोन्ही रा. दावडीगांव, डोंबिवली पुर्व) यांना पकडुन त्यांच्याकडे चौकशी केली असता लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाल्याने त्यांनी दुचाकीवरून वेगवेगळ्या ठिकाणी चैन स्नैचिंग करुन दागिने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या तिवारी आणि ठाकूर या दोघांकडून ६ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा सुमारे ७ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणात मानपाडा, टिळकनगर, डोंबिवली व विष्णुनगर पोलीस ठाणेचे हद्दीतील १० गुन्हे उघडकीस आणले आहेत.
हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सपोनिरी. सुरेश डांबरे, अविनाश वनवे यांच्या पथकाने केली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास