१६६ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान
ठाणे
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, गणेशवाडी, ठाणे येथे नववर्षाच्या पहिल्या रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १६६ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करुन नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्याच्या हेतुने संत निरंकारी मिशनच्यावतीने मुंबई महानगर प्रदेशात जवळ जवळ प्रत्येक आठवड्याला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. निरंकारी भक्तांमध्ये मानव सेवेसाठी उत्साहाने पुढे येण्याची ही भावना त्यांच्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन शिकवणूकीमध्ये निहित आहे ज्यांच्या कथनानुसार जीवन तेव्हाच महत्वपूर्ण ठरते जेव्हा ते इतरांसाठी जगले जाते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे चेंबूर येथील सेक्टर संयोजक बाबूभाई पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे स्थानिक प्रबंधक आणि सेवादल अधिकारी उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक डॉ.आर. एस. यादव यांनी स्थानिक सेवादल युनिट आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने या शिबिराची सुंदर प्रबंध व्यवस्था तयार केली होती.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास