जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोचा २५ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
कल्याण
जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोचा २५ वा वर्धापनदिन नुकताच पश्चिम येथील जलाराम हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात कोविड काळात काम करणाऱ्या सुनीता राघवन, महेंद्र डोळस, रुक्मिणी काळे ठोंबरे, स्वप्नील शिरसाठ, चेतन म्हामुणकर, अविनाश पाटील यांच्या कामांची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो ही कल्याण आणि आसपासच्या परिसरात काम करणारी एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षा वीणा नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संस्थेने १९९७ मध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. एस पी काकरमठ यांच्या नेतृत्वाखाली आपला प्रवास सुरू केला होता. तो आजवर निरंतर चालु आहे.
यावेळी लॉकडाऊन काळात काम करणाऱ्या कल्याणमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा कोविड वॉरियर्स म्हणून सत्कार करण्यात आला.
जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोचे संस्थापक सदस्य सुदर्शन आशान आणि प्रकाश बनारे ज्यांनी गेली २५ वर्षे या संस्थेची अत्यंत समर्पणाने सेवा केली आहे त्यांनाही यावेळी स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायंट्स सदस्य विजय बापट, अजय नाईक, संजय सातपुते, जयश्री सातपुते, विलास दगडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात जायंट्स वेलफेअर फाऊंडेशनचे मान्यवर नंदा शेट्टी, मनोहर पालन आणि अशोक मेहता हे देखील उपस्थित होते.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास