कल्याण
पारंपारिक मराठी गाण्यात आता बॉलीवूडला टक्कर देण्यासाठी आधुनिक प्रयोग केले जात आहेत. असाच एक नवीन ट्रेड ‘प्रेमाचा राडा’ या मराठी गीताद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गावात राहणाऱ्या एका तरुणाचे शहरातील मुलीसोबत झालेले प्रेम. या प्रेमाला तिच्या घराच्यांसह तिच्या भावाचा झालेला विरोध. या दोघांचे प्रेम आणि त्या प्रेमातून झालेला राडा म्हणजेच ‘प्रेमाचा राडा’.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, २०२२ चे भारत श्री झालेले सुर्यकांत जाधव हे या गीतात मुख्य भूमिकेत आहेत. तर, त्यांच्या जोडीला शुभांगी अरडळकर आहे. अतुल खरात यांची निर्मिती असलेल्या या गीताचे दिग्दर्शन योगेश जी यांनी केले आहे. गीतकार वैभव कर्डक यांच्या गीताला विशाल शिंदे यांनी स्वरबद्ध केले असून आनंद मडवी यांनी गायले आहे. या गीतासाठी संजय जाधव यांनी विशेष सहकार्य केले आहे. विशेष बाब म्हणजे, दोघेही नवखे असूनही हे चित्रीकरण दोन दिवसात पूर्ण करण्यात आले आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू