April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

ग्रामीण भागात विविध कार्ड बनविण्यासाठी शिबिराचे आयोजन

कल्याण

 एस.एस.टी. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व घोटसई ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क आधार कार्ड बनवून देणे, आयुष्यमान भारत योजना या अंतर्गत विमा काढून देणे तसेच नवीन पॅनकार्ड बनवून देणे व अद्ययावत करून देण्याचे शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण शिबिरात सुमारे ७० ग्रामस्थांना ई-श्रम कार्ड, ३० ग्रामस्थांना पॅन कार्ड बनवून देण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत योजना व नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी नोंदणी करून घेतली.

कार्ड बनविण्यासाठी ग्रामस्थ नोंदणी करताना

शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारे, कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल तेलंगे, प्रा. मयूर माथुर, महाविद्यालयातील स्टाफ जितेंद्र पवार आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले. शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी घोटसई ग्रामपंचायत सरपंच संतोष धुमाळ, माजी सरपंच काशिनाथ मगर, उपसरपंच वनिता मगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याण, संचालक योगेश धुमाळ, माजी उपसरपंच योगेश मगर, यांसोबत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वामन मगर, सविता मगर, सुयोग मगर, रोशनी धुमाळ, दया मगर, जागृती गायकवाड आणि मनोज पवार यांची उपस्थिती लाभली.