April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

गुरू अर्चना पालेकर यांचा ‘मदर इंडिया’ पुरस्काराने सन्मान

 

  • नृत्यकला निकेतन’च्या विद्यार्थीनींचा जागतिक विक्रम : महाराष्ट्र गीतावर भारतनाट्यमचे सादरीकरण -.  नृत्याची नोंद  ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये
  • हा तर भरतनाट्यमचा सन्मान – गुरूअर्चना पालेकर यांची प्रतिक्रिया

मुंबई

“४१ वर्षांपूर्वा लावलेल्या ‘नृत्यकला निकेतन’ या संस्थेच्या इलवल्याश्या रोपट्याचे रुपांतर आज वटवृक्षात होताना पाहून आनंद होतोय. १५०० पेक्षा जास्त विद्यार्थीनींना भारतनाट्यचे शिक्षण दिले आहे. हे शिक्षण मी इथे माझे गुरु रमेश पुरव सर, मथुरा प्रसाद श्रीवास्तव, विजया मेहत, कमलाकर सोनटक्के, वसंत बापट यांच्यामुळे  देऊ शकले. या मान्यवर मंडळींकडे मी जे काही नृत्य आणि अभिनयाचे धडे गिरवले तेच मी माझ्या नृत्य साधनेतून माझया विद्यार्थीनी देऊ शकले आहे,” असे भावूक उद्गार गुरूअर्चना पालेकर पालेकर यांनी काढले. ‘युवा व्हिजन’ या संस्थेतर्फे ‘नृत्यकला निकेतन’च्या संचालिका  गुरू अर्चना पालेकर  यांना  त्यांच्या भरतनाट्यम क्षेत्रातील ४१ वर्षांहून अधिक कारकिर्दीतील  उल्लेखनीय योगदान तसेच भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल ‘मदर इंडिया’ या पुरस्काराने मुंबईतील चर्नीरोडच्या ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी गुरू अर्चना म्हणजे  अर्थात विद्यार्थीनींच्या लाडक्या माई बोलत होत्या.  त्यावेळी व्यासपीठावर  मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनिल देसाई,  निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदे, रश्मी ठाकरे, शीव क्रेडीट सोसायटीचे संचालक हेमंत तुपे, महिला विभाग प्रमुख युगंधरा साळेकर, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे, संतोष शिंदे आणि युवा व्हिजन संस्थेचे पांडुरंग सकपाळ, प्रथमेश  सकपाळ, तेजस  सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

“प्रत्येक गुरूला एक  चिंता असते की,  माझा वारसा कोण चालवणार? पण मला याची चिंता नाही. कारण मी दोन पिढयांना घडवलेले आहे. इथे मला माझी  मुलगी नृत्य दिग्दर्शिका मयुरी खरातआणि माझी नात मानसी खरात  खरात यांचा उल्लेख करावसा वाटतोय. ‘नृत्यकला निकेतन’चा वारसा त्या जपातीलच. शिवाय दर्जेदार विद्यार्थीनीही घडवतील याची खात्री आहे, असेही गुरू अर्चना पालेकर अभिमानाने बोलल्या.

“आजच्या धकाधकीच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताल-लय हरवलेल्या आयुष्यात नवी प्रेरणा देत राहील. याचे सारे श्रेय गुरू अर्चना पालेकर यांचे आहे. नृत्यकला निकेतनच्या विद्यार्थीनींनी त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली  इथे बहारदार अशी शास्त्रीय नृत्याची भारतनाट्यम ही कला सादर केली, ते पाहून मी भारावून गेलो. या विद्यार्थीनींनी सादर केलेली ही भरतनाट्यम नृत्यकला म्हणजे गुरू अर्चना पालेकर यांच्यासाठी अनोखी गुरुदक्षिणा ठरली आहे,”  असे कौतुकोत्गार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी काढले.

‘मदर इंडिया’  पुरस्कार सन्मान सोहळ्यात  गुरूअर्चना पालेकर यांना  ‘नृत्यकला निकेतन’च्या विद्यार्थीनींनी अनोखी भरत नाट्यम नृत्यसादरीकारणातून अनोखी  गुरुदक्षिणा वाहिली. शिवतांडव स्तोत्र, महिषासूर मर्दिनी स्तोत्र,  स्वामी तारक मंत्र या धार्मीक स्तोत्रांवर भरत नाट्यमचे सादरीकरण केले. त्यावेळी  महाराष्ट्र राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा… ‘ यावर ‘नृत्यकला निकेतन’च्या  ३६ विद्यार्थीनींनी ३. ३६ सेकंदाचे भारतनाट्यमचे सादरीकरण केले.  नृत्याची नोंद  ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.  त्याचे सन्मानचिन्ह आणि नियुक्ती पत्र गुरू अर्चना पालेकर आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या नृत्य दिग्दर्शिका मयुरी खरात यांना देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन युवा व्हिजन या संस्थेने केले होते.