कल्याण
महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकविरा पालखी समजल्या जाणाऱ्या पालखीला कल्याणमधून आज सुरवात झाली आहे. कल्याण पूर्वेतील तिसगांव ते एकविरा पालखी सोहळ्याचे यंदाचे १२ वे वर्ष असल्याने या पालखी सोहळ्याला एक तप पूर्ण झाले आहे. श्री जरीमरी आई एकविरा मित्र मंडळाने या पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे.
आज सकाळी या पालखीचे विधिवत पूजन केल्यानंतर श्री तिसाई मंदिरातून एकवीरा गडाकडे प्रस्थान करण्यात आले. या पालखीत हजारो तरुण मंडळी सहभागी झाली असून आज वाजत गाजत ब्रास बॅन्ड आणि डिजेच्या तालावर पालखीला सुरवात करण्यात आली. या पालखी सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, भाजपा युवा मोर्चा वैभव गायकवाड आदींसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
श्री जरीमरी आई एकविरा मित्र मंडळाच्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे बारावे वर्ष असून महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी म्हणून ओळख आहे. तिसगांव आणि आजूबाजूच्या गावातील सुमारे अडीच ते तीन हजार युवक यात सहभागी होत असतात. या पालखीला निघताना अनेक सामाजिक कामे करून निघतो. तीन दिवस पायी चालत चौथ्या दिवशी एकविरा देवीचे दर्शन घेऊन या पालखीची सांगता करण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संकेत गायकवाड यांनी दिली.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
अंबरनाथमध्ये विकासकामांना गती : खा. शिंदे यांचा आढावा
समाज जागृतीत योगदानासाठी स्टडी व्हेवजला पुरस्कार