ठाणे
सतीश प्रधान ज्ञानसधना महाविद्यालय, बीइंग मी आणि जीवन संवर्धन फाउंडेशन यांच्या वतीने ‘फ्रॉम स्ट्रगल टू स्ट्रँथ : नेव्हिगेटिंग अँड नेट्वर्किंग फॉर होमलेस चिल्ड्रन’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद झाली. यावेळी पार पडलेल्या स्पर्धेत बेस्ट रिसर्च पेपरचे कल्याण पूर्वेतील दिनेश गुप्ता मानकरी ठरले.

पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा बाहेरचे ज्ञान पुस्तकांमध्ये आले पाहिजे. कोणत्याही पदवीने भारताचे दारिद्र्य संपवू शकत नाही. आधुनिक जगात काय चालले आहे याचा शोध घेतला पाहिजे असे मत पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. यावेळी, संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, प्राचार्य डॉ. गणेश भगुरे आणि प्रा. सीमा केतकर उपस्थित होते.
या परिषदेत कल्याणमधील जीवन संवर्धन संस्था आयोजनात होती. तसेच, कल्याण पूर्व येथील समाजसेवक उमाकांत चौधरी यांनी बेघर मुले आणि त्यांचे सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थिती या विषयावर सत्र घेतले.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५
कल्याणात रोटरी क्लबचा ‘अमृत जल’ उपक्रम