कल्याण
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र शासनाने राबविलेल्या “फ्रीडम टू वॉक” या संकल्पनेत भारतातील काही स्मार्ट सिटीनी सहभाग घेतला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. हि स्पर्धा १ ते २६ जानेवारी या दरम्यान होणार आहे. स्पर्धेच्या निकषानुसार महापालिकेतील एकूण पाच सदस्यांनी सहभाग घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत फ्रीडम टू वॉक या स्पर्धेत टीम लीडर म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे असून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त पल्लवी भागवत व महापालिका सचिव संजय जाधव हे इतर सदस्य आहेत.

फिटनेस हे लक्ष्य समोर ठेवून घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या जनजागृतीचा एक भाग म्हणून आज महापालिकेच्या टीमने सकाळी वसंत व्हॅली येथून सुमारे १२ किलोमीटर चालून नागरिकांना फिटनेसचे महत्व पटवून दिले. यामध्ये कल्याण रनर्स, मॉर्निंग वॉक ग्रुपमधील सदस्य तसेच महापालिकेतील उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, माजी नगरसेवक सुनील वायले, सहा विक्रीकर आयुक्त प्रमोद बच्छाव, मनोज आंबेकर आणि लहान मुले यांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शारीरिक फिटनेससाठी नियमित स्वरूपात चालणे, धावणे, सायकलिंग करणे अशा प्रकारच्या व्यायामाला प्राधान्य द्यावे असे आवाहन नागरिकांना केले.
स्पर्धेच्या निकषानुसार महापालिकेची टीम रोज सकाळी चालून नागरिकांना फिटनेसचे महत्व पटवून देत आहे. त्याची नोंद strava या ॲपवर केली जाते. त्यातील नोंदीनुसार स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात कल्याण डोंबिवली महापालिका देशात प्रथम क्रमांकावर असून वैयक्तिक स्पर्धेत महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत या पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहेत
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास