कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आयोजित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई यांची संयुक्त जयंती महोत्सव आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा नुकताच आचार्य अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ अनुपमा साळवे तर विचार मंचकावर उपस्थित चंद्रमनी मेश्राम (अतिरिक्त कार्यकारी अभियंता म.रा.वि वि.,) चंद्रकांत पोळ (संस्था अध्यक्ष), दत्ता गिरी (संघटना अध्यक्ष), दामोदर साळवे (जयंती समिती अध्यक्ष), नागेश टोळ (प्रकाशन समिती अध्यक्ष), प्रमुख वक्त्या शितल साठे, भुषण कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ आणि जयंती समिती अध्यक्ष दामोदर साळवे यांनी प्रस्तावना सादर केली.
सत्यशोधक समाजाच्या उन्नतीसाठी सर्व जाती एकत्र करून सत्यशोधक समाजाची स्थापना करून चळवळ उभी केली नंतर अशिक्षित पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन शिक्षित केले. पुण्यातील फुले वाड्यात १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. फुले दाम्पत्याने वैदिक धर्माला नाकारून समतेची चळवळ उभी केली. समतेचा जागर म्हणून या वर्षी पुण्यातील फुले वाड्यात आम्ही दोनशे महिला एकत्र येऊन फेर धरून जागर करण्यात आला. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्याकडून आजच्या महिलांनी प्रेरणा घेऊन आपल्या आचरणात कृती करुन जीवन जगले पाहिजे आणि आपले जीवन सुंदर करायचे असेल तर स्त्री पुरुष समानतेची मूल्य जपली पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन प्रमुख वक्त्या शाहीर शितल साठे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात कवि सम्मेलन झाले. या कवी संमेलनाचे अध्यक्ष अरुण भालेराव होते. प्रा.शुक्राचार्य गायकवाड आणि जयवंत सोनवणे यावेळी विचार मंचकावर उपस्थित होते. अनेक कवी आणि कवित्री यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास