कल्याण
मलकापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुमारी गट बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. एस.एस.टी. महाविदयालयातील आठ खेळाडुंचा या संघात समावेश होता. यातील सर्व खेळाडुंनी बहारदार खेळ करत स्पर्धेच्या सुरवातीपासुनच सर्व संघावर मात करत आपल्या उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. पण पुणे जिल्हा संघासोबत झालेल्या अत्यंत अतितटीच्या सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध करु शकले नाही.
यामध्ये कप्तान दिपाली धुळे, आरती यादव, रेणुका खनाल आणि भारती सोनी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण आपल्या संघाला पराभवापासुन वाचवु शकले नाही. त्याचप्रमाणे सुमन रॉय, अस्मिता साळवे, कल्पना वर्मा आणि भाविका चव्हाण यांची सुद्धा संघाला मदत मिळाली. गेली दोन वर्ष सर्व खेळाडू स्पर्धेला मुकले होते. पण अत्यंत आनंदात सुरुवात झालेल्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पोटे आणि सहसचिव लीना कांबळे यांनी सर्व खेळाडुंचे अभिनंदन केले एस.एस.टी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार, महाविद्यालयाचे मार्गदर्शक दिपक खरात, सरथ पिल्ले, सचिन कालिकल, भावना खरात आणि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे हरीश सत्पती यांनी देखील विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन केले.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास