सम्राट अशोक विद्यालयातील उपक्रम
कल्याण
विविध पदांवरील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते. त्या पदावर जाण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास व कष्ट घ्यावे लागतात. अशा प्रकारच्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने “आम्ही यशस्वी महिला” ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला होता.
शाळेतील मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना टिळक नगर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका लीना मॅथ्यू यांनी उत्तर देताना सांगितले, शिक्षणातून सुसंस्कारित होणे आवश्यक आहे. मला माझ्या आई-वडिलांच्या आणि शिक्षकांच्या योगदानामुळे मी खेळाडू झाली आणि शिक्षण पूर्ण करून शिक्षिका झाली आता मुख्याध्यापिका आहे. उच्च न्यायालयातील वकील मनीषा भिलारे यांनीही मुलांना आपण कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाचं जीवन कष्टमय असते असंही त्या म्हणाल्या. उद्योजक लीना शिर्के यांनी चिकाटी आणि परिश्रम महत्त्वाचे आहेत अपयश येते पण खचून न जाता प्रयत्न करा. माझ्यासारख तुम्हालाही यश मिळेल असे त्या म्हणाल्या.

परिसंवादात शाळेतील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील सहशिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. गायत्री चव्हाण, सुहानी चौधरी, सुवार्ता पवार, प्रशिक थोरात या मुलींनी सहभाग घेतला. परिसंवादाचे प्रस्ताविक व आभार सहशिक्षिका माधुरी काळे यांनी केले. जिजामातांच्या भूमिकेत मनस्वी मढवी व बाल शिवाजी यांच्या भूमिकेत मंथन मढवी हे कार्यक्रमाचं आकर्षण होते.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास