शिवसेना आणि आमदार भोईर यांनी केली होती आयोजित
कल्याण
शिवसेना कल्याण पश्चिम आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांसह आणखी 20 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. येथील महाजनवाडी सभागृहात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सव काळामध्ये ही घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अडीचशेहून अंतिम अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. ज्यापैकी 23 स्पर्धकांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये तुषार पाटील कुटुंबिय पहिला, विक्रांत फंड कुटुंबिय 2रा आणि राहुल पंडीत कुटुंबियांच्या गणेशोत्सव सजावटीने अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकावला. तर अक्षय अशोक धुमाळ, धर्मेश सावनिया, कशिश म्हात्रे, लक्ष्मण तरे, आंबिवली, मयूर बारापात्रे, निलेश देशमुख, नितिन सोनावणे, ओमकार म्हस्कर, प्राजंली भोसले, रविंद्र कटके, रिंकेश गोंधळे, संदीप आवारी , शरद आव्हाड, शरद गारवे, सुमित तमखाने , तुषार चौधरी, विलास खोत, विशाल धुमाळ, यश लोखंडे, योगेश चोंडीकर कुटुंबियांच्या गणपती बाप्पांच्या सजावटीचा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्यांचा आयोजक आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक छाया वाघमारे, माजी नगरसेवक संजय पाटील, वैशाली भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि चांदीचे जास्वंदाचे फुल देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले.
ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये हजारो नागरिकांनी आम्हाला त्यांच्या घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्र प्रवेशिका पाठवल्या होत्या. त्यापैकी पहिल्या 3 विजेत्या स्पर्धक आणि 20 उत्तेजनार्थ अशा 23 जणांना आज पारितोषिके देऊन गौरविल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली. तर पारितोषिक मिळाल्यानंतर या स्पर्धकांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद आणि समाधान हीच या स्पर्धेची पोचपावती असल्याची भावनाही आमदार भोईर यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, जयवंत भोईर, विभाग प्रमुख रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील, युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर आदी पदाधिकारी आणि स्पर्धेत सहभागी झालेले कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह