कल्याण
विधानसभा मतदारसंघ 142 कल्याण पूर्वेत महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अफवांना बळी पडू नका असा आदेश दिला. पक्षाचा आदेश हाच अंतिम आदेश असतो. पक्षाचा आदेश आहे महायुतीच्या उमेदवारास प्रचंड बहुमतांनी विजयी करायचे आहे.
कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी शिंदे गटातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला दिलेली जबाबदारी ही तंतोतंत पाळलीच पाहिजे. आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा. याविषयी कोणालाही शंका येता कामा नये अशी तंबी वजा आदेश कार्यकर्त्यांना देत महायुतीच्या स्थानिक नेत्यांना महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या विजयाचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला.
या मेळाव्याला भाजपा ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (अप्पा) शिंदे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, रमाकांत देवळेकर, उपजिल्हा प्रमुख अरुण आशान, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर,भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मंडळ अध्यक्षा सविता देशमुख, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, राजाराम पावशे, नवीन गवळी, मल्लेश शेट्टी, माजी नगरसेविका हेमलता पावशे, इंदिरा तरे, राजवंती मढवी, माधुरी काळे तसेच महायुतीचे इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह