December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध

महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध

महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध

निरंकारी सामूहिक विवाह सोहळ्यात

साधे विवाह व अध्यात्म यांच्या संगमाचे अनुपम दृश्य

महाराष्ट्र

संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे नुकतेच निरंकारी सामूहिक साध्या विवाहांचे एक अनुपम दृश्य प्रदर्शित झाले. ज्यामध्ये देश-विदेशातील एकंदर 96 नव वर-वधु सतगुरु माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात परिणय सूत्रात बांधले गेले. त्यामध्ये भारतभरातील महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगढ़, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांव्यतिरिक्त विदेशातील आस्ट्रेलिया, यू.एस.ए. या देशातील जोडप्यांचा समावेश आहे. या प्रसंगी निरंकारी मिशनचे अधिकारीगण, वधू-वरांचे माता-पिता व नातलग तसेच मिशनचे अनेक भाविक भक्तगण उपस्थित होते. सर्वांनी या दैवी दृश्याचा भरपूर आनंद प्राप्त केला.

सामूहिक विवाह कार्यक्रमाची सुरवात पारंपारिक जयमाला व निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझा-हार (सामायिक हार) यानी झाली. त्यानंतर भक्तिमय संगीताच्या तालावर ‘निरंकारी लावां’चे प्रथमच हिंदी भाषेतून गायन करण्यात आले ज्यातील प्रत्येक ओळ नव विवाहित युगुलांसाठी सुखमय गृहस्थ जीवन जगण्याची कल्याणकारी शिकववण देत आहे. नव विवाहित युगुलांवर सत्गुरु माता जी व निरंकारी राजपिता जी तसेच तिथे उपस्थित सर्वांनी पुष्प-वर्षा केली आणि त्यांच्या कल्याणमय जीवनासाठी भरपूर आशीर्वाद प्रदान केले.

नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माताजी म्हणाल्या की, गृहस्थ जीवनाच्या पवित्र बंधनात नर व नारी दोहोंचे समान स्थान असते, ज्यामध्ये कोणी लहान-मोठा नाही. दोघांना समान महत्व आहे. सहयोगाचे हे एक उत्तम उदाहरण असते. सतगुरु माताजींनी सर्व नव विवाहित दाम्पत्यांना आनंदमय जीवन व्यतीत करण्यासाठी शुभाशीर्वाद प्रदान केले.