१८३ विद्यार्थ्यांच्या कलात्मक सादरीकरणाने वाढवली सोहळ्याची रंगत
मुंबई
वंचित आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या समग्र विकासासाठी झटणाऱ्या ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पार पडला. मुंबईच्या वांद्रे परिसरातील रंग शारदा सभागृहामध्ये पार पडलेल्या या सोहळ्यास ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’च्या महालक्ष्मी, माहीम, वांद्रे, शहापूर, मुरबाड आणि कसारा इथल्या निवारागृहातील १८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ८३ विद्यार्थ्यांनी नृत्य कलेचे बहारदार सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकत मनोरंजन केलं.
सोहळ्यास जिल्हा बालविकास अधिकारी शोभा शेलार, बालकल्याण समिती मुंबई शहर अध्यक्ष महादेव सावंत व सदस्य श्याम मेस्त्री, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पेनिनसुला अध्यक्ष कैलास रजनी, स्तंभलेखिका, लोकप्रिय सिनेदिग्दर्शक बिमल रॉय यांच्या कन्या रिंकी रॉय-भट्टाचार्य, दि वात्सल्य फाऊंडेशन’ च्या अध्यक्षा डॉ. सफला श्रॉफ, सचिव स्वाती मुखर्जी, विश्वस्त फ्रेडी मार्टीस यांसारख्या ५७ प्रमुख पाहुण्यांची सोहळ्यास उपस्थिती लाभली.
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’च्या यंदाच्या या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याची थीम होती आनंदाचा प्रकाशोत्सव. संस्थेचे स्वयंसेवक, स़स्थेचे सुहृद, आजी-माजी विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम ‘स्नेहमिलन’ सोहळ्याद्वारे गेल्या ४३ वर्षांपासून केले जात आहे.
वंचित, निराधार, रस्त्यावरच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम स्वाती मां आणि त्यांची टीम अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. दि वात्सल्य फाऊंडेशन’च्या मुलांची प्रगती थक्क करणारी आहे.
जिल्हा बालविकास अधिकारी
शोभा शेलार
आणखी बातम्या
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह
अफवांना बळी पडू नका : खासदार शिंदे