The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

भाजपा संघटनपर्व प्रदेश प्रभारी पदी आ. चव्हाण

सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी राजेश पांडे

मुंबई

भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व या उपक्रमाच्या प्रदेश प्रभारी पदी माजी मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. त्याचबरोबर पक्षाच्या प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा अनिल सोले यांची तर प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणी साठी संघटन पर्व उपक्रम सुरु करण्यात आला असून त्याच्या नियोजनाची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून नागपूर येथून संघटन पर्वाची सुरुवात कऱण्यात आली आहे.  प्रदेश अनुशासन समितीत छ.संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी आमदार अतुल शाह व योगेश गोगावले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सक्रिय सदस्यता अभियानाचे सह प्रमुख म्हणून प्रवीण घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *