October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता

मुंबई

राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्सना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचे परिपत्रक 3 जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रोसिटीपर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडिया मधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशनादरम्यान सुद्धा तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुरावामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील 12 हजारहून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत सन 2019 पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राज मान्यता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर यश मिळाले आहे.