कल्याण
कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटलने आज डॉक्टर-केंद्रित क्विक रिस्पॉन्स ट्रेनिंग (क्यूआरटी) उपक्रम ‘कोड क्यूआरटी’ची घोषणा केली. या उपक्रमाचा तरूण अननुभवी प्रॅक्टिशनर्सना निदान व वैद्यकीय मूल्यांकन कौशल्यांसह सक्षम करण्याचा मनसुबा आहे. १ जुलै रोजी डॉक्टर्स डे निमित्त या १५ दिवसीय प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम अननुभवी प्रॅक्टिशनर्सना सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
फोर्टिस हॉस्पिटल्स मुंबईच्या ईसीएमओच्या प्रोग्राम डायरेक्टर (प्रोग्राम कन्व्हेनर) डॉ. जुमाना हाजी, फोर्टिस हॉस्पिटल्स मुंबईचे फर्स्ट एड व बीएसएल अँड सीपीआर ट्रेनर डॉ. मनजीत सिंग, इमर्जन्सी मेडिसीनचे एचओडी डॉ. सुधीर गोरे आणि फोर्टिस हॉस्पिटल कल्याणच्या इमर्जन्सी मेडिसीनचे कन्सल्टण्ट डॉ. मनोज कुमार हे कोड-क्यूआरटीचे नेतृत्व करतील. या उपक्रमामधून प्राथमिक केअरगिव्हर्सना अपस्किलिंगच्या माध्यमातून सुसज्ज करण्यासोबत प्रदेशातील रूग्णांच्या आरोग्यसेवा गरजांची उत्तमप्रकारे पूर्तता करण्यास सक्षम करण्याप्रती फोर्टिस हॉस्पिटल कल्याणची कटिबद्धता दिसून आली.
कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या भागातील अनेक गंभीर आजारी रुग्णांना आजाराच्या प्रगत टप्प्यात मुंबईतील तृतीयक केंद्रांमध्ये हलवले जाते हे ओळखून, फोर्टिस हॉस्पिटल कल्याणमधील क्लिनिशियन्सनी हा प्रशिक्षण उपक्रम विकसित केला, ज्यामुळे जवळच्या परिसरातील अननुभवी प्रॅक्टिशनर्स रूग्णासोबत भेटीच्या पहिल्या दिवसापासून प्रभावी केअर देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह सुसज्ज होतील. हा उपक्रम विविध आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची काळजी आणि उपचाराच्या आवश्यक पैलूंबाबत ज्ञान देतो. यामध्ये उपदेशात्मक लेक्चर्स आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश आहे, जेथे रुग्णांचा इतिहास घेणे व शारीरिक तपासणी, आपत्कालीन इमेजिंग, ईसीजीबाबत माहिती, गंभीर परिस्थितीत प्रभावी संवाद, रक्त तपासणी व इतर तपासण्यांचे स्पष्टीकरण आणि वेळेवर व योग्य केअर सेवा वाढवण्यासाठी सोप्या निर्णय घेण्याच्या साधनांचा वापर यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
पायलट बॅचसाठी कल्याण-डोंबिवली परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जेथे ९० हून अधिक नोंदणी, ७५ अननुभवी प्रॅक्टिनशर्स या पहिल्या बॅचमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची अपेक्षा आहे.
फोर्टिस हॉस्पिटल कल्याणला हा प्रशिक्षण उपक्रम राबवण्यास प्रेरित केलेल्या गोष्टीबाबत सांगताना फोर्टिस हॉस्पिटल्स मुंबईच्या ईसीएमओ प्रोग्रामच्या संचालक व कोड-क्यूआटी प्रोग्राम कन्व्हेनर डॉ. जुमाना हाजी म्हणाल्या, ‘प्रगत केंद्रांवर पोहोचेपर्यंत बऱ्याच रुग्णांचे नुकसान होते. केअरच्या पहिल्या टप्प्यावर मर्यादित निदान जागरूकतेमुळे हा विलंब होतो. आम्ही कोड-क्यूआरटीच्या माध्यमातून ही तफावत दूर करू इच्छितो. आमचा रुग्णांना वेळेवर आणि योग्य केअर सेवा देण्याचा मनसुबा आहे.. आमचा समुदाय-स्तरीय डॉक्टरांवर खूप विश्वास आहे. आपण त्यांना लवकर धोक्याची लक्षणे ओळखण्यास सक्षम करू शकलो तर अधिक लोकांचे जीव वाचवू शकतो.’
मुंबईसह देशाच्या इतर भागांमध्ये विस्तार करण्याच्या योजना प्रगतीपथावर असण्यासह कोड-क्यूआरटी प्रबळ, अधिक कनेक्टेड आरोग्यसेवा सिस्टम निर्माण करण्यास मदत करत आहे, जी दररोज समुदायांना सेवा देणाऱ्या व्यक्तींसह सुरू होते.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
अंबरनाथमध्ये विकासकामांना गती : खा. शिंदे यांचा आढावा
समाज जागृतीत योगदानासाठी स्टडी व्हेवजला पुरस्कार