October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसची रणनीती ठरवणारी विशेष बैठक संपन्न

संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

सोनल सावंत-पवार
कल्याण : पाम रिसॉर्ट, कल्याण येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभागाचे प्रभारी यु. बी. वेंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विशेष बैठक पार पडली.

या बैठकीदरम्यान येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाच्या आगामी धोरणांवर चर्चा झाली आणि उपस्थितांमध्ये उत्साह व नवचैतन्याची लहर जाणवली.

या बैठकीचे आयोजन कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रय पोटे यांनी केले होते. बैठकीस राजन भोसले (प्रभारी, कल्याण-डोंबिवली) आणि ब्रिज दत्त (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) यांनीही उपस्थित राहून कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आणि संघटनात्मक मजबुतीसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

या प्रसंगी श्रीकृष्ण सांगळे (सहप्रभारी), प्रदीप चौबे, गुरूगोविंदसिंग बच्चर, कांचन कुलकर्णी, राजाभाऊ पातकर, मुन्ना तिवारी, सुरेंद्र आढाव, विमल ठक्कर, शकील खान यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीतून काँग्रेसची कल्याण-डोंबिवलीमधील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला.