कल्याण
कोळशेवाडी पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव 2024 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळांचा आज सन्मान करण्यात आला. एकूण 40 मंडळांपैकी सामाजिक उपक्रम, जनजागृतीपर देखावे व शिस्तबद्धता या निकषांवर आधारित तीन उत्कृष्ट मंडळांची निवड करून त्यांना पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात आली.
कार्यक्रम पोलिस ठाण्यात सकाळी 11:05 ते 12:40 दरम्यान पार पडला. निवड समितीच्या निर्णयानुसार खालील प्रमाणे विजेते घोषित करण्यात आले:
प्रथम क्रमांक – शिवगर्जना मित्र मंडळ, गवळीनगर, कल्याण (पूर्व)
व्दितीय क्रमांक – न्यू संघर्ष मित्र मंडळ, चिंचपाडा रोड, पावशे मराठी शाळेसमोर, कल्याण (पूर्व)
तृतीय क्रमांक – अष्टविनायक सेवा मंडळ, महावीर नगर, खडे गळवली, कल्याण (पूर्व)
या निवडीत निरीक्षण समिती सदस्य उमाकांत चौधरी, प्रवीण खाडे (शिक्षक) आणि शिवशंकर साव यांचा सहभाग होता. सर्व विजेत्या मंडळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे निरीक्षण समिती सदस्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात पोलिस ठाण्याच्यावतीने सूचित करण्यात आले की, पुढील गणेशोत्सवात डी. जे. चा वापर टाळावा, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. इतर मंडळांनाही प्रेरणा देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास 22 ते 25 प्रतिनिधी उपस्थित होते, यामध्ये विविध मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य आणि पोलीस मित्र सहभागी होते. उपस्थित मंडळांनी पोलिस दलाकडून मिळालेल्या गौरवाबद्दल आभार व्यक्त केले.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
अंबरनाथमध्ये विकासकामांना गती : खा. शिंदे यांचा आढावा
समाज जागृतीत योगदानासाठी स्टडी व्हेवजला पुरस्कार